मनुष्य निसर्गावस्थेतून कपड्यांकडे का आला हा एक मुद्दा आहे.
इथे एक मुद्दा असा आहे की अनेकदा कपडे फक्त शरीर झाकून ठेवण्यासाठी न घातले जाता विरुद्ध लिंगी व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा घातले जातात. हा काय कुठे घालावं वा घालू नये हे स्वतः बरोबर अनेकदा समाजावर सुद्धा अवलंबून असते.
अनेकदा कपडे तुमची मनोवृत्ती व्यक्त करतात. आता राजकारणी लोक पाहा. ते कधी सभेला जीन्स घालून येतात का भारतात? आपण स्वच्छ प्रतिमेचे आहोत हे त्यांना कपड्यातून व्यक्त करायचे असते.
हे मुद्दे बाजूला ठेवायचे म्हणाले तर मग कोणी काय घालायचे हा ज्याचा त्याचा मुद्दा असू शकतो.
आता बलात्कारा बद्दल बोलायचे म्हणाले तर ती एक विकृती आहे. स्त्रीचे कपडे हे एक न पटणारे कारण आहे. जर हा मुद्दा मान्य करायचाच म्हणालं तर मग मला राहून राहून एक प्रश्न पडतो. कट्टर मुसलमान समाजात जिथे स्त्रिया बुरख्याने पुर्ण पणे आच्छादीत असतात त्यांच्यात सुद्धा हे प्रकार फार घृणास्पद प्रकारे घडतात. आपण बातम्या वाचत असतोच. सांगायचा मुद्दा हा की बलात्कार करण्याची मानसिकता ही वृत्ती आहे आणि ती एक विकृती आहे. इच्छे विरुद्ध देह उपभोगणे हा बलात्कार आहे.
हा झाला एक विचार. पण अनेकदा कायद्याचा गैर वापर करण्यासाठी स्त्रिया याचा वापर करताना मागे पुढे पाहत नाहीत. या प्रकारात जो आधी राजी खुशीने घडलेला प्रकार असतो त्याला बलात्कार म्हणून सिद्ध केले जाऊ शकते आणि त्यात पुरुषाचा आयुष्यभरासाठी मानसिक बलात्कार होतो. कदाचित पुढच्यावेळी तो खरा बलात्कार सुद्धा करू शकतो.
शेवटी असे म्हणता येईल की, फक्त कपडे हे बलात्काराचे कारण बनू शकत नाहीत. पण ठरवले तर पुरुषाला बरबाद करण्यासाठी स्त्री त्याचा नक्की वापर करू शकते. कृपया याचा अर्थ सगळ्या स्त्रिया असे करतात असा लावू नये.
(चिंतातुर चाणक्य)