चटका लावणारे किस्से! ;-)
मी १२वीत बोर्डाच्या परिक्षेच्या प्रात्यक्षिक परिक्षेत गडबडीत नायट्रिक आम्ल असलेली परिक्षानळी ज्वाळेवर धरली होती. आणि सगळ्या द्रवाने ताबडतोब हवेत उड्डाण केले होते त्याची आठवण झाली. सुदैवाने मनगटावरच्या एका थेंबाशिवाय बाकी सगळे कुडत्यावर पडले. त्यामुळे काही विशेष त्रास झाला नाही. कुडत्याला मात्र भोके पडली! आणि पारपत्रावर लिहायला मला एक खूण मिळाली. ;-)