साधारणत: असा एक समज आहे की लहान मुलांना वारंवार होणाऱ्या सर्दिवर होमिओपथी फार प्रभावी असते. यावर माझे निरिक्षण असे आहे की या पद्धतिचा उपचार इतकी वर्षे चालतो की हळूहळू मूल मोठे होते, त्याची रोगप्रतिकारशक्ति वाढते व सर्दीचा त्रास साहजिकच कमी होतो व श्रेय होमिओपथीला जाते. बाकी फारसे तत्थ्य नाही. मुळात हे डॉक्टर इतका वेळ प्रश्न विचारतात, इतकी माहिती विचारतात त्यामानाने ठोस औषध देत नाहीत. समजा मुलांना अचानक खूप ताप चढला तर यांच्याकडे काही अल्पकालात गुण देइल असे औषध नसते व अखेर रुग्णाला ऍलोपथीचाच आसरा घ्यावा लागतो. केवळ होमिओपथीचाच इलाज घेत आहेत व ऍलोपथीच्या औषधांकडे अजिबात वळले नाहीत तरीही खडखडीत बरे झालेत असे रुग्ण मला माहित नाहीत. अनेक होमिओपथीवाले डॉक्टर सर्रास ऍलोपथीची ईंजेक्शन देतानाही दिसतात.

यावर डॉक्टर मंडळींनी अधिक प्रकाश टाकावा.