११वी सायन्सचं पहिलं chemistry चं प्रॅक्टीकल आणि पार्टनर म्हणून कॉन्व्हेंटमधली मुलगी. आमचं आत्तापर्यंतच शिक्षण भावे 'मुलांचे' हायस्कूल मधे मराठी मिडीयम मधे झालेलं त्यामुळे १ इंग्लीश वाक्य बोलायचं तर मेंदूला खूप आकडेमोड करायला लागायची आणि वरती मुलींशी बोलायची काहीच सवय नाही. या सर्वांमुळे प्रचंड ओशाळलो होतो.

प्रॅक्टीकल मधे काहीतरी पॅरॅफीन गरम करायचं होतं. शेजारी ती बया उभी. तिची १०० इंग्लीश वाक्य वि. माझं १ वाक्य असल्या जोरदार गप्पा चाललेल्या. पॅरॅफीन ढवळताना आधीच माझे हात थरथरत होते तेवढ्यात तिने माझ्या खांद्यावर Tap केलं आणि होऊ नये ते घडलं. त्या अनपेक्षित tap मुळे एवढा दचकलो कि ते गरम पॅरॅफीन मी माझ्या पँटवर ओतून घेतलं. आमच्या चेहऱ्याचं वर्णन करण्यात काहीच अर्थ नाही. एवढी वाईट अवस्था (याला slang मधे 'हेटाई') नशीबाने परत झाली नाही. पुढे ४ दिवस मी तिला तोंड दाखवलं नाही.