ही वनस्पती हिंदुस्थानाच्या काही दूरस्थ (remote) भागांत पहिल्यापासूनच नैसर्गिक स्वरूपात उगवत असली, तरी तिची लागवड आणि संगोपन (cultivation), ती पाण्यात उकळून दूधसाखर टाकून पिणे ही संकल्पना आणि त्या संकल्पनेचा हिंदुस्थानी मुख्यप्रवाहात (mainstream) प्रसार हे सर्व तर इंग्रजांनीच केलं ना? ज्ञानेश्वरांच्या काळातल्या पुण्याच्या मुळशी (पौड) तालुक्यातल्या एखाद्या वृद्ध शेतकऱ्यास ('पौडाच्या म्हाताऱ्यास') 'चहा' म्हणून काही चीज असते, हे माहीत असायचं काही कारण होतं का? शिवाजी महाराज चहा पीत होते का?
- टग्या.