१. आपल्या इथे 'सेक्स ही वाईट गोष्ट आहे' असे बरेच वेळा का पटवून दिले जाते? की आपल्या संस्कृतीत ही गोष्ट बसत नाही ?

काहीतरीच काय रे मोरोपंता!! असं असत तर आपल्या देशाची लोकसंख्या अशी अमर्याद वाढली असती का?

२. सर्व पालक आपल्या 'पौगंडावस्थेतील' मुलांशी का मोकळे पणाने बोलत नाहीत ? जसे 'आई-मुलीला' एक 'मैत्रीण' आणि 'वडील-मुलाला' एक 'मित्र' या नात्याने.
ते ढीग बोलतील पण पोरं समोर बसून ऐकून घेतील का? अमेरिकेतही नाही ऐकत म्हणे. पहा-  American Pie.

३. किशोरावस्थेतील मुलांच्या काही प्रश्नांना  पालकांनी कसे उत्तर द्यायला पाहिजे ? जसे - 'माझा जन्म कसा झाला?', 'आई सेक्स म्हणजे काय गं?' 

'माणसाने नेहमी खरे बोलावे' असे आई-बाबा सांगायचे आणि 'मग तुम्ही नेहमी खरे बोलता का?' याचे उत्तर ते ज्या तोऱ्यात 'होऽऽ' असं सांगायचे तितक्याच खरेपणाने या प्रश्नांची उत्तरेही द्यावीत.

४. सर्व शाळांत हा विषय इतर शालेय विषयांसारखा 'सक्तीचा' विषय म्हणून का नाही शिकवला जात ?  (काही शाळांत चालतो पण फारच अल्पप्रमाणात) याविषयावरील एखादे 'पाठ्यपुस्तक' का नाही ?
मुलांच 'विषय' ज्ञान वाढेल या भितीपायी असावे. तसे एक ग्रेट पाठ्यपुस्तक 'वात्सायन' कधीच लिहून गेलाय. तुम्हाला वेळ असेल तर थोडं मार्केटींग करा ना मोरबा.

५. प्रसारमाध्यमांमुळे (दूरचित्रवाणी, मासिके इ.) किशोरावस्थेतील मुलांना 'सेक्स' विषयीची कितपत कल्पना मिळते ?  
'सेक्स' हा 'सिक्स' नंतर येणारा एखादा आकडा आहे इतकंच.

६. जवळच्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून मिळालेल्या अर्धवट माहितीमुळे त्यांच्या मनात न्यूनगंड येऊ शकत नाही काय ?  

माहित नाही बुवा. मला तर something is better than nothing असंच ऐकल्याचं आठवतंय.

७. मुलांसमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी जोडपे प्रेम व्यक्त करायला का लाजतात ? (चुंबन घेणे इ. शिष्टाचाराला धरून) . परदेशात - विकसीत आणि मागासलेल्या देशांतील समाजात याला मान्यता आणि महत्त्व आहे. यातून आई-वडिलांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे कळून मुलांना आपल्या कुटुंबाविषयी जिव्हाळा नाही का वाटणार ?

अरे बाबा! चुंबनाच काय घेऊन बसलास? ते (आईच्या मैत्रिणींना, बाबांच्या मित्रांना, घरी आलेल्या पाहुण्यांनाही दिले जाते) मिठ्या मारणे तर सर्रास. तेव्हा पोरांनी नको नको तिथे जिव्हाळा बघायला सुरूवात केली तर काय घ्या????

असो. उत्तरे ह. घेण्याजोगी आहेत.