अनुभव आवडला. चुकीच्या पॉजमुळे जसा विनोद घडला तसा चुकीच्या उच्चारामुळे कसा विनोद घडतो त्याचे एक उदाहरण.
एक मराठी माणूस मरण पावला तेंव्हा त्याच्या पत्नीच्या सांत्वनाला त्यांचा दक्षिण भारतीय शेजारी गेला. तो बरीच वर्षे मुंबईत रहात असल्यामुळे उत्तम मराठी बोलत असे. फक्त उच्चारात थोडी गडबड होई. तो आपल्या तरुण शेजारणीला म्हणाला,"वहिनी, शोक करू नका. जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. आता यापुढे तुम्हाला मुलांकडे बघून जगायचं आहे. सर्व व्यवस्थित होईल. वहिनी, तुम्ही फक्त दीर सोडू नका."