श्री. मोरोपंत,
तुमच्या वरील लेखा(प्रश्ना)पैकी फक्त एका वाक्याबद्दलचे माझे विचार मांडीत आहे. पण त्यावरून तत्स्म विचार बाकीच्या भागाबद्दलही मांडता येतील, पण तसे करण्यास वेळ नाही आणि सध्या तरी करू इच्छित नाही.
यातून आई-वडिलांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे कळून मुलांना आपल्या कुटुंबाविषयी जिव्हाळा नाही का वाटणार ?
आई-वडिलांचे एकमेकावरील प्रेम व्यक्त ते एकमेकांशी दिवसभर कसे वागतात यावरून कळते.
"काय ग चहा नाही केलास अजून? दिवसभर काही काम नाही आणि नुसता चहा धड वेळेला मिळत नाही"
"काय धांदरट तुम्ही? पोहे आणायला सांगितले तर चुरमुरे आणलेत. आता चिवडा काय करणार डोंबल!"
"तुला काहीच कळत नाही स्क्वेअर कट काय आणि पुल कशाशी खातात ते"
"मित्रांबरोबर चकट्या पिटायच्याऐवजी माझ्याबरोबर साडीच्या दुकानात यायचं म्हणजे उठलीच आठी कपाळावर"
असे सकाळपासून रात्रीपर्यंत संवाद मुलांच्या समोर घडत असतात. त्यावरून त्यांना जो जिव्हाळा वाटायचा तो वाटतो.
प्रेमाने पालक वागले तर मुले जे शिक्षण मिळवतात ते दुसऱ्या कशाने मिळत नाही.
माख्या मनात आलेले पटकन उतरविले आहे.
कलोअ,
सुभाष