मला काही बाबतीत होमिओपथीचा चांगला अनुभव आहे. मात्र होमिओपथी ही आणीबाणीमध्ये वापरण्यासारखी उपचारपद्धती नाही, अशावेळी ऍलोपथीकडेच जावे हे बरोबर. पण होमिओपथीचे उपचार काही वेळा चांगले परिणाम देतात. उदाहरणार्थ, जंतांच्या समस्येवर सीना (cina) हे औषध. तसेच थंडीच्या दिवसात नखाच्या बाजूची त्वचा, त्वचेचे बारीक साल निघून तेथे दुखते, झोंबते, त्यावर कॅल्फॉस हे औषध प्रभावी आहे. मात्र मोठ्या आजारांवर होमिओपथी परिणामकारक नसावी. त्यामुळे तुमच्या आजारानुसार पथी वापरली तर फायदा होऊ शकतो.