वरदाताई,
तुमच्या लेखाचा मथळा काय आहे?
"हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत" ते हिंदुस्थानी आहे म्हणजे भारतभर किंवा जगभर चालते. त्यात जर प्रादेशिक भाषेत केलेल्या रचना असतील तर ते "मराठी" शास्त्रीय संगीत होईल.
दुसरा मुद्दा - अभिजात शास्त्रीय संगीत हे पिढीजात समर्थ गुरूंकडून शिष्यांतर्फे लोकांपुढे सादर केले जाते. त्याला घराण्याची आणि वर्षांची परंपरा असल्याशिवाय मान्यता येत नाही. तेव्हा मराठी चीजा अशाप्रकारच्या संगितात चटकन येतील असे वाटत नाही.
तात्यांनी काही उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या गायक/संशोधकांच्या चीजा बांधण्यासंबंधी सांगितले आहेच. आता पं. कायकिणींच्या चीजांचा प्रसार व्हायला आणखी २-३ पिढ्या जायला लागतील. असेच असते हो. ही अशा चीजा बांधणे ही जादूची कांडी फिरवण्यासारखे नाही.
प्रयोगादाखल एका मान्यवर (बंगाली) गायकाने इंग्लीश्मध्ये ख्याल गायला होता. पण तो कोणालाच रुचला नाही. हा प्रयोग अमेरिकेत त्यांनी केला होता.
बघा, हे माझे $०.०२ पटले तर घ्या नाहीतर फेकून द्या.
कलोअ,
सुभाष