त्यात धन्यवाद कसले. :)

पण खर सांगु का प्रियाली मनोगतवर लिहिताना जो उत्साह व समाधान मिळते ना ते ब्लॉग मधे नाही. त्यामुळे पहिले प्राधान्य मनोगत. असो.

असे होऊ शकेल. पण मला विचाराल तर मनोगतावर कायम दुसऱ्यांचा विचार करून लेखन करावे लागते. स्वतःला काय लिहायचं आहे यापेक्षा दुसऱ्यांना ते किती रुचेल याचाही विचार करावा लागतो म्हणून स्वतःच्या मनातलं काही उतरवायचं असेल तर ब्लॉग सारखा पर्याय नाही.

मला विचाराल तर माझ्या मनाला आनंद द्यायला मला माझे ब्लॉग्ज आणि मनोगत दोन्ही आवडतात.  पण अहंकाराला गोंजारायला फक्त मनोगत कामी येते (ब्लॉग्ज नाही).