हो, तुमचें म्हणणें बरोबर आहे, "खा खा सुटणें" तसें पाहिलें तर यादीत बसत नाही. हा "खा खा" वाक्प्रचार बघुन एक मज़ेदार अनुभव आठविला. एका मित्राच्याबरोबर चहाच्या दुकानात बसलो होतो. भिंतीवर "रवा रवा रवा" (= बारीक सांजा) अशी जाहीरात लावलेली होती. मित्र गोंधळून ती जाहीरात "खा खा खा" म्हणून वाचू लागला! "पड खाणें " हा वाक्प्रचार यादीत अगदी बरोबर बसतो. "पड खाणें" आणि "उचंबळ खाणें" म्हणजे एक चांगली विपर्यायार्थी (?) जोडी झाली. प्रश्न: दोन्ही अजून प्रचारात आहेत कां ?
पीटरराओ