सुभाष जी,  आपला आभार मानतो.  दोन-तीन प्रश्न आहेत:

१. खार खाणें :  उदाहरणार्थ  "सतत माझ्यावर खार खात असतात"?  (हे मला एकच उदाहरण मिळालं, महाराष्ट्र टाइम्स च्या साइट मधून)  "मीठ खाणें" म्हणून मराठी मध्ये म्हणतां येते कां, हिन्दी-उर्दू मध्ये "नमक खाना" म्हणतात त्याच अर्थाने?

२. गोता खाणें :  उदाहरणं मिळत नाहीत.  एक उदाहरण देतां येईल कां?  (मोल्सवर्थ त्यांनी ह्याचे तब्बल तीन अर्थ दिलेले आहेत.)

३. चपराक खाणें : घरी परतल्यावर बिचाऱ्यानं चांगली चपराक खाल्ली असेल.  उदाहरण बरोबर आहे कां ?

४. ठेच खाणें = हिन्दी-उर्दू ची "ठोकर" कां ? पुढच्या माणसानं ठेच खाल्ली म्हणजे मागला हुशार होतो.  असं वापरायचं कां ?

५. मलिदा खाणें : त्यानं मलिदा खाल्ला म्हणजे त्याची कणीक तिंबली गेली कां ?

                                                पीटरराओ