१. भैरवी मधील चीज - ताल त्रिताल
घेई प्रभुचे नाम मनुजा
पूर्ण होई तव सकल ही काम ॥धृ॥
अंतरा
भव भय सगळे जाईल विलया
शरण ही घे तू प्रभुच्या पाया
गाई मधुर हे नाम मनुजा ॥१॥
२. खमाज मधील चीज
किती गोड गोड तव मूर्ती शाम ही
वसत हृदयी मम कमली भ्रमर सम
सुचत न मज गृह काम धाम ॥धृ॥
अंतरा
कुंज विहारी हे गिरीधारी
नाही सरीस शत कोटी काम ॥१॥
३. पटदीप मधील चीज
रजत रंगी नटले वसुधातल,
मंद मंद ये पवन सुशीतल ॥धृ॥
अंतरा
बघुनी कुमुदिनी फुलति जलातुनी,
हृदयी प्रीत झरते मधुमंगल ॥१॥
४. कामोद मधील चीज
मधुर मुरली अधरी आज का धरिशी माधवा
मधुरव तव शिकवी ते, बोल फोल खास जिवा ॥धृ॥
अंतरा
कुरु समरी ना वचन दिले तू
स्मरसी नच का अभय देवोनि पांडवा ॥१॥
५. शंकरा मधील चीज
कंपित ब्रम्हांड गोल
मंडित नर रुंड माळ
रंजित रिपु रक्त भाल
चंडी रण रंगी खेले ॥धृ॥
अंतरा
मंथिन मी वैरी भाव
हीन मंद तेज करिन
दीन नेत्र दीन वक्र
सिंह नाद जय बोले ॥१॥
६. बिलावल मधील चीज
सदया मम प्रभु राम दयाघन, अमित अघ हरुनी चुकविसी माया ॥धृ॥
अंतरा
मज अभया झणी दे रघुराया, गांजिती या विपती घोर समया ॥१॥