प्रश्न विचारायला चुकला आहे का?

बहुदा तुम्हाला, "भारताचा हिंदुस्थान कसा झाला?" असं विचारायचं असावं. winking

असो.

 

शाळेत शिकलो त्याप्रमाणे सध्याच्या भारतीय उपखंडाला भरत राजाच्या नावावरून 'भारतवर्ष' असे नाव होते. त्याचेच पुढे 'भारत' असे झाले.

भारतीय उपखंडाला 'आर्यावर्त' असेही नाव वापरले जात होते.

मध्ययुगात मुघलांची आक्रमणे झाली. त्यांनी भारताला हिंदूंचा प्रदेश म्हणून 'हिंदुस्थान' संबोधायला सुरुवात केली.

ब्रिटिश आले, त्यांनी स्वयंघोषीतपणे भारताला 'इंडिया' नाव दिले. (इंडस नदीच्या नावावरून.)

लोकांनी कितीही बारसे केली तरी, आपल्या देशाचे नाव 'भारत' हेच योग्य आहे.

 

सध्यातरी, भारत हे नाव भारतातील लोक वापरतात.

हिंदुस्थान हे नाव अजुनही काही हिंदी, उर्दू भाषिक लोक व मुस्लिम देश वापरतात.

दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय पातळीवर 'इंडिया' हेच नाव अजूनही आपण वापरतो.

 

भारताच्या नावाबद्द्ल अधिक माहिती येथे.