सुमीत,
किस्सा आवडला.
असाच आणखी एक किस्सा आठवला-
काही वर्षांपूर्वी इथे मुंबईत चर्चगेटहून बोरीवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये घडलेली ही गोष्ट आहे. गाडीत दुसऱ्या वर्गाच्या डब्यात नेहमीप्रमाणेच प्रचंड गर्दी होती.
अंधेरी स्थानक जवळ आल्यावर एका 'परप्रांतीय' (बहुधा गुज्जू - दुसरे कोण) माणसाने दरवाज्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला विचारले, 'उतरना है क्या?'  यावर त्या माणसाने कुठलेही उत्तर दिले नाही आणि वाट आडवून होता तिथेच उभा राहिला. पहिल्या माणसाने पुन्हा तोच प्रश्न विचारला, आणि ह्याने पुन्हा काही उत्तर दिले नाही.
आता पहिल्या महाशयांना शंका आली, 'अबे, पियेला है क्या?'
शंका अगदीच खरी होती. 
तो दारातून बाजूला व्हायचे नावच घेत नव्हता. म्हणून गुज्जूभाईंनी त्याला माफक शिवीगाळ करून वाट करून देण्याची विनंती केली. तरीही उपयोग झाला नाही!
शेवटी गुज्जूभाईंनी त्याच्या श्रीमुखात जोरदार ठेवून दिली, आणि स्वतःसाठी जागा करून घेऊन अंधेरीला उतरले.
यानंतर थोडा वेळ शांततेत गेला. दरवाज्यात उभ्या असलेल्या दुसऱ्या एका माणसाने त्या दारूड्याला विचारले, 'कुठे राहता?'
तो म्हणाला 'बोरीवली'.
पहिला - 'मराठी आहात का?'
तो - 'होय, का हो?'
पहिला - 'काही नाही, ऐकून घेतलत म्हणून विचारतोय!'
हे ऐकून त्या दारूड्यासह सगळा डबा हास्यकल्लोळात बुडाला.