भाषकाका,

गेल्या दोन दिवसात मी काही जुन्या पुणेकरांकडे चौकशी केली. दुर्दैवाने त्यांच्यात याबाबत एकमत आढळले नाही. एका गृहस्थांनी आपंण सांगितलेल्या कथेशी सहमती दर्शवली परंतु द्रविडांच्या खुनाची कथाही एकदोघांनी सांगितली. मला याबाबत निर्णय करणे अवघड आहे. सबब दुसरी शक्यता म्हणून आपण सांगितलेली कथाही नोंदवून ठेवतो. व्य. नि. मध्ये म्हटल्याप्रमाणे ही कथा सत्य आहे हे मला माहीत होते, पण त्याचा संबंध खुन्या मुरलीधराशी आहे हे माहीत नव्हते.

तर मनोगतींनो, ही दुसरी कथा.

मुरलीधराचे देऊळ ज्यांनी बांधले, त्यांनी उत्तम सुस्वरूप मूर्ति घडवून आणली.  ती मूर्ति नाना फडणीसांना त्यांनि त्यानंतर बाधलेल्या तुळशीबागेतल्या देवळाकरता हवी होती.  मुरलीधराच्या देवळाच्या मालकांना हे अजिबात पसंत नव्हते व त्यांनी विरोध केला.  नानांनी तेव्हा जबरदस्तीने ती मूर्ति आणण्याकरता शस्त्रधारी पथक पाठविले आणि त्यां लोक मारले गेले.  ती मूर्ति तिथून हलवू दिली नाही.  यामुळे त्या देवळाला खुन्या मुरलीधर असे नाव पडले.

 -विचक्षण