जनसेवाची आठवण नक्कीच झाली. पियुष कसें करतात याचे कुतुहल होतेच. पण ते इतके सोपे असेल असं वाटलं नव्हतं. तरीही एक शंका आहेच. त्यात थोडं दूध घालावं लागतं कां ? तसेच माझी एक सूचना. मी दह्याची लस्सी करतांना प्रत्यक्ष साखर वापरण्या ऐवजी साखरएचा पाक केलेला वापरतो. त्याने चव तर सुधारतेच आणि ती कांही वेळ ठेवली गेली तरी ती काळसर पडत नाही. ही युक्ती मी नागपूरच्या एका प्रसिध्द लस्सी भांडाराकडून शिकलो. पियुष करतांनाही ही युक्ती वापरता येईल.