आपल्या सहमती बद्दल धन्यवाद आणि नवीन चांगला मुद्दा उपस्थित केल्याने अभिनंदन.

आपल्या इतिहासात डोकावून पाहिले असता त्या वेळची स्त्रियांची वेषभूषा सुद्धा काही शी उत्तेजकच होती.

बलात्कारा झालेल्या स्त्रीला समाजातील आणि कुटुंबातील स्थान अबाधित राहणे महत्वाचे आहे.तसे न करणे  हे बलात्काराच्या मूळ गुन्ह्यापेक्षा देखील भयंकर असते.

अत्यंत योग्य मुद्दा. समाज किती दुष्ट असू शकतो याची अनेक उदाहरणे मिळू शकतील.

बलात्काराच्या केसेस जेव्हा न्यायालयात येतात त्यावेळी त्या स्त्रीला जाहीर विचारले जाणारे प्रश्न हे अत्यंत घृणास्पद असतात. अश्या चौकश्या वा कारवाया बंदिस्त आणि पुर्ण पणे खाजगीत व्हायला हव्यात.