जर भांडणे मुलांसमोर नि:संकोचपणे केली जातात, तर प्रेम का लपवा? मुलांना कळू दे की आईबाप भांडतात तसेच प्रेमही करतात. अर्थात चुंबन घेतल्यानेच प्रेम सिद्ध होते असे नाही, एकमेकांशी एरवी कसे वागतो त्यातून ते व्यक्त होतेच. मुद्दा एवढाच की चुंबन एवढे 'अब्रह्मण्यम' मानू नये.

-विचक्षण