अर्थातच स्त्रियांसाठी सीता आणि उर्मिला.

कपड्यांची चर्चा योग्य दिशेने (म्हणजे बलात्कार व कपड्यांचा संबंध नाही या) चालली आहे. पण या वरच्या मुद्द्याचे कोणीच खंडन केलेले दिसले नाही. स्त्रियांकडून सीता (त्यातल्या त्यात बरे) व उर्मिला बनण्याची अपेक्षा ठेवणाऱ्या पुरुषांनी डोळे उघडून बघण्याची गरज आहे. सीतेचे व उर्मिलेचे वागणे त्यांचे त्यांच्या नवऱ्यांवर आत्यंतिक प्रेम होते असे दाखवणारे असेल जास्तीत जास्त. (प्रेमाचा काही प्रतिवाद करता येत नाही.) पण त्यांचे वागणे प्रॅक्टिकल नव्हते असे माझे स्पष्ट मत आहे. खरे तर ही पात्रे पुरुष लेखकांनी स्त्रियांना गंडवण्यासाठी, अंकित ठेवण्यासाठी रचलेली आहेत असेच वाटते.