मला वाटत याला आपले पूर्वज कारण असावेत. शारीरिक प्रेम खाजगीत व्यक्त करण्याचा संकेत आपल्याकडे पूर्वी पासून पाळत आल्याने कदाचित चुंबन हे खाजगी असावे. मला वाटत आई वडिलांनी मुलांसमोर वाद नाही घातले तरी ते एकमेकांना आदर देतात हे संकेत देऊ शकतात. जर वडिलांनी मुलांसमोर आईवर हात उगारला (शक्यता किती आणि कुठे?) तरी सुद्धा त्याचा परिणाम मुलांवर होतोच. थोडक्यात काय? आई वडिलांच्या शारीरिक आणि भावनिक कृतीने मुलांना मिळायचे ते संकेत मिळतात.
जर असे शिक्षण द्यायचेच झाले तर कोणत्या वयात हे सर्वात महत्वाचे आहे. मुलींना बहुदा हे आई कडून नेहमीच मिळत असते असे माझे मत आहे.