माझ्या मते आपल्या देशाचे हिंदुस्तान असो वा भारत नावाने काही फरक पडत नाही. श्रीलंका किती सुंदर नाव आहे.

सिंडॉन म्हणजे ग्रीक भाषेत कापूस. ग्रीकांना कापूस आपल्यामुळे माहीत झाला असे वाटते.

तसेच भाषाशास्त्राच्या दृष्टीने हिंदुस्थान हा शब्द चुकीचा आहे. हिंदुस्तान योग्य आहे. हिंदुस्थान हा चुकीचा शब्द हिंदुत्ववादी अतिशय आवडीने वापरतात.

मध्ययुगात केवळ मुघलांची आक्रमण झाली नाहीत. सल्तनत काळ हा मुघलकाळापूर्वी झाला. ह्या काळात तुर्की गुलामांनी दिल्ली ताब्यात घेतली. (मामेलक वंश म्हणजे गुलाम वंश असे आठवते. कुतुबुद्दिन ऐबक गुलाम होता.)

भारताचे इंग्रजी नाव इंडिया आहे.  इंग्रजीत उच्चार इंड्या (इंड्यऽ).
 इंडिया हे इंग्रजी नावही घेतले हे बरे झाले नाहीतर. हिंदू पार्ट ऑफ़ इंडिया म्हणजे भारत आणि मुस्लिम पार्ट ऑफ़ इंडिया म्हणजे पाकिस्तान असे इतरांनी म्हटले असते.

फारसी भाषेत हिंदू ह्या शब्दाचा अर्थ काळा असाही आहे.

एक शेर बघा -
अगर ऑन तुर्के शिराज़ी बदस्त ऑरद दिले मारा
बख़ॉले हिंदू अश बख़्शम समरकंदो बुख़ारा रा

अर्थ:
जर तो/ती शिराज़ी तुर्क माझ्या हाती लागला/लागली तर मी त्याच्या/तिच्या काळ्या तिळासाठी समरकंद आणि बुख़ारा कुर्बान करायला तयार आहे.

चित्तरंजन

चित्तरंजन