मी अकरावीत (विज्ञान) असताना माझा पटक्रमांक (रोल नंबर.. चू.भू.द्या̱̱. घ्या.) ४२१ होता. एकदा माझे जीवशास्त्राचे जर्नल (मरठी शब्द??) तपासत असताना प्राध्यापिकांनी मला जवळ बोलावून सांगितले की यांत काढलेल्या आकृत्या अगदीच चुकीच्या आहेत. मी त्यांच्याजवळ कबूल केले की मी दुसऱ्या मुलीच्या जर्नलमधून या ट्रेस केल्या आहेत. तर त्यांनी विचारले की कोणाच्या जर्नलमधून? तर मी म्हणले xxx च्या जर्नलमधून..तर त्या प्राध्यापिका हसून म्हणाल्या की मग बरोबर आहे..
त्या मुलीचा पटक्रमांक ४२० होता. :D