हाहाहा...

मीही माठच होते रसायनशास्त्रात पण रेड्डी सरांमुळे थ्रिल कळलं रासायनिक अभिक्रियांची गणितं सोडवण्यामधलं. त्यांची नुसती ओळख करून दिली गेली होती तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या अपरोक्ष सुंदर हसण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे 'स्माब्लॅ' ( स्मायलिंग ब्लॅकी ) म्हणून चिडवायचो पण नंतर त्यांच्या हरहुन्नरी शिकवण्याच्या लकबीने त्यांनी आमची दोस्ती जिंकली. मग आम्ही त्यांच्यासाठी योजलेलं नाव त्यांना सांगितलं होतं... तेव्हा काय खत्तरी हसले होते ते .. :D कलिजा खल्लास ! ते शिकवायला आले नसते तर कदाचित माझाही असाच उद्धार झाला असता रसायनशास्त्रात.. काही सांगता येत नाही !