उर्दूत भारताला colloquially काहीही म्हणत असोत, रेडिओ पाकिस्तानच्या उर्दू बातमीपत्रांतही भारताचा उल्लेख कायम 'भारत' असाच केलेला ऐकलेला आहे. (विशेषतः झियांच्या काळात. नंतर रेडिओ पाकिस्तान ऐकण्याचा फारसा योग आला नाही.)
कदाचित पाकिस्तानचे सरकारी धोरण भारताला अधिकृतरीत्या 'भारत' असेच म्हणण्याचे आहे की काय, कळत नाही. तसेच 'डॉन'मधल्या विविध लेखांत/सदरांतही (इंग्रजीतून) भारताचा उल्लेख 'इंडिया'व्यतिरिक्त कधीकधी 'भारत' असाच केलेला पाहिलेला आहे. (हे कुत्सितार्थी असेल अथवा नसेलही.) 'भारतीय'ऐवजी मात्र 'भारती' वापरतात (जसे 'पाकिस्तान'पासून 'पाकिस्तानी', 'ईरान'पासून 'ईरानी', 'अमरीका'पासून 'अमरीकी', तसेच 'भारत'पासून 'भारती'), असे दिसते.
कदाचित 'भारत' म्हणजे आताचा 'भारत', 'हिंदुस्तान' म्हणजे फाळणीपूर्व (ब्रिटिश) हिंदुस्थान, 'भारत'ला आम्ही 'हिंदुस्तान' मानत नाही (कारण 'हिंदुस्तान'वर आमचाही हक्क आहे?), असे काहीसे अप्रत्यक्षपणे सुचवायचे आहे की काय, हे कळत नाही. किंवा, भारताचे अधिकृत नाव 'भारत' असल्याने ते वापरायचा प्रयत्न, हेही असू शकेल. परंतु काहीही असले तरी अधिकृतरीत्या भारताला 'हिंदुस्तान' म्हणणे टाळण्याचा कटाक्ष जाणवतो खरा. (पूर्वी रेडिओ पाकिस्तानवरच्या उर्दूतून क्रिकेटचे धावते वर्णन देणाऱ्या समीक्षकांनाही 'भारत' हाच शब्द वापरताना ऐकलेले आहे.)
- टग्या.