खार खाणे - डूख धरल्यासारखा राग असणे.
खाणारे लाख खार खाऊ देत.. हू केअर्स?

मीठ खाणे - उपकृत झालेले असणे.
खाल्लेल्या मीठाला जागण्याहून मोठं असं काय असतं आयुष्यात?

गोता खाणे - गटांगळी खाणे / भरकटणे 
परत खाल्लास ना गोता तू याही परीक्षेत? ( इथे गटांगळी खाल्ली असे म्हटले तरी चालेल ! )

चपराक खाणे ( किंवा बसणे ) - गुन्ह्याबद्दलची योग्य ती शिक्षा मिळणे.
प्रत्येक गुन्हेगाराला सणसणीत चपराक खायला घातलीच गेली पाहिजे.

ठेच खाणे - केलेल्या कष्टाचं चीज न होणे.
माझी स्वप्नं पूर्णत्वास नेण्यास अजून किती म्हणून ठेचा खाव्या लागणार आहेत?

मलिदा खाणे / लोणी खाणे - इतरांचे कष्टसाध्य लाटणे.
त्याचं काय जातंय फुकटाफाकट मलिदा(/लोणी) खायला? 

चु.भू.द्या.घ्या.