प्रत्येक माणसाला एक खरे नाव आणि एक बोली नाव (हाक मारण्याचे, उदा. दादा) असते. त्याचप्रकारे आपण स्वतःला घेतलेले नाव 'भारत' आहे. त्याचे अनेक अर्थ सांगता येतील. एक सांगतो. भा म्हणजे तेज. रत म्हणजे रममाण झालेला. म्हणून तेजात (ज्ञानाच्या) रममाण झालेल्या लोकांचा देश तो भारत.

हिंदुस्थान हे नाव परकीयांनी दिलेले आहे. त्याची व्युत्पत्ती सिंधु पासून होते हे मान्य झालेले आहे.स्थान की स्तान हा वाद मला पटला नाही. कारण तुम्ही कोणती भाषा प्रमाण मानता यावर ते अवलंबून आहे.

आता हे नाव परक्यांनी दिले असले तरी व्यवहारात आपण तेच नाव वापरतो जे लोक आपल्याला देतात.  उदा. आपले नाव आई वडीलच ठरवत असतात. त्यामुळे व्यवहारात हिंदुस्थान नाव रूढ झाले.

हल्ली काही वर्षात राष्ट्रीय दृष्टीच्या अभावाने काही लोकांना हिंदु हा शब्द जातीवाचक वाटू लागला. (खास करून वृत्तपत्रात) त्यामुळे भारत हा शब्द अधिक प्रचलीत झाला. पण या शब्दांच्या अर्थात वस्तुतः काहीही फरक नाही.