मुंबई महाराष्ट्रात आहे हा एकच जमेचा भाग मला या मध्ये दिसतो.
त्यात सुद्धा ही इंग्रजांची कृपाच म्हणावे (त्यांच्या अमदानी पासूनच हे नगर औद्योगिक नगर आहे असा माझा समज), का भौगोलिक परिस्थिती आणि इंग्रज या दोहोंची कृपा म्हणावे ! 
मराठी माणसाने हे नगर औद्योगिक नगर व्हावे म्हणून नक्की काय केले आहे हे सजून घ्यायला आवडेल.
येथे व्यवसाय करणारे आणि मोठे व्यापार करणारे बहुसंख्य जर गुजराथी आणि इतर भाषा बोलणारे असतील तर त्याच भाषेत व्यवहार होणार. मग आपण टाहो फोडून काय उपयोग. उद्या 'गुजराथीमध्ये टाहो फोडा' काय रडताय ते समजत नाहीये असे ऐकायची वेळ आली तर नवल ते काय?
--लिखाळ.