हिंदुस्थान हा शब्द काय फार जातीयवादी आहे का ?
मुळीच नाही.
मात्र, स्वातंत्र्यापूर्वी हिंदुस्थान/हिंदुस्तान हाच शब्द अधिक प्रचलित होता, असे वाटते, त्यामुळे त्या सवयीमुळे स्वातंत्र्यानंतरही काही वर्षांपर्यंत (वर्तमानपत्रांत किंवा संभाषणातसुद्धा) वापरला जात असावा. याउलट भारत हे नाव आपण स्वातंत्र्यानंतर अधिकृतरीत्या घेतले, त्यामुळे नंतर भारत असे लिहिण्याची /म्हणण्याची पद्धत हळूहळू वाढीस लागल्यामुळे हिंदुस्थान/हिंदुस्तान असे म्हणण्याची/लिहिण्याची पद्धत मागे पडत गेली असावी, असे वाटते. हा झाला एक भाग.
दुसरे म्हणजे, हिंदुस्थान/हिंदुस्तान म्हणजे (स्वातंत्र्यापूर्वीचा, ब्रिटिश अधिपत्याखालचा) अखंड हिंदुस्थान आणि भारत म्हणजे सध्याचा (स्वातंत्र्यानंतरचा, फाळणीनंतर उरलेला आणि 'भारत' हे नाव अधिकृतपणे घेतलेला) भारत असेही distinction कधीकधी वापरलेले आढळते.
अर्थात, हिंदुस्थान/हिंदुस्तान हा शब्द दोन्हींपैकी कोठल्याही अर्थाने (म्हणजे स्वातंत्र्यपूर्व अखंड हिंदुस्थान किंवा स्वातंत्र्योत्तर भारत) वापरलेला चूक नाही, परंतु स्वातंत्र्योत्तर भारत अशा अर्थी भारत हे नाव/term अधिक अधिकृत आणि अधिक precise आहे, एवढेच. यात जातीयवादाचा/निधर्मीपणाचा काहीही संबंध नाही.