रोळी (उच्चार/शब्द रोवळी?) हे पूर्वी तांदूळ धुण्यासाठी वापरायचे भांडे असायचे.  त्याचा आकार साधारण मध्यम आकाराच्या तपेल्या सारखा असे.  त्याच्या बुडाला आणि साधारण २५-३० मि.मि. वर अशी लहान भोके असत.  मी लहान असताना माझ्या आजीकडे कोकणातल्या त्या लहानशा खेड्यात खूप राहिलो होतो.  मी तेव्हा ४-५ वर्षाचा होतो.  माझी आजी मला खालच्या शेतावर आमची पिण्याच्या पाण्याची विहिर होती तिच्यातून पाणी काढून ते तांदूळ रोळीतून धुवून आणायचे काम द्यायची.  पहिल्यांदा पांढरे पाणी येई दोन-तीनदा धुवून झाले आणि साधारण स्वच्छ पाणी आले की तांदूळ नीट धुतले गेले असे तिने मला शिकवले होते.  ती रोळी तांबे या धातूची बनवली होती.  आजही कशी स्पष्ट डोळ्यासमोर उभी राहिली आहे!

त्या आठवणीला उजाळा देण्याची संधी दिल्याबद्दल रोहिणीताई, अनुताई, आणि प्रवासी महोदय धन्यवाद.

सुभाष