अहो खुशीताई,
जरा मार्जार प्रेमींबरोबर भूतप्रेमींचीही माफी मागा बरं. म्हणजे आम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो त्यांना तुम्ही घाबरता? तुमच्या वसतिगृहातलं बोलणारं मांजर जाम आवडलं. तशी मला कुत्र्या मांजरांची फारशी भीती वाटत नाही. (अंगावर येणाऱ्या कुत्र्यांची वाटते.)
मी पूर्वी जिथे राहात होते तिथे शेजारणीकडे दोन मांजरं होती. ती अशीच भर दारात लोळत पडलेली असायची. कधीतरी हाणावी का एक लाथ पेकाटात अशी दुष्ट इच्छा व्हायची पण दावा टाकला त्या माऊच्या आईने तर काय घ्या म्हणून त्यांना वळसा घालून जावं लागे.
बरं त्या मांजरांची नावं पण काय भन्नाट, एकाच नाव 'मॅकरोनी' आणि दुसऱ्याचं नाव 'ब्लू चीज़'. दोघांवरून कधीतरी लाँग जम्प ही मारून जाव लागायचं.
तुम्हाला फोबिया असेल तर असंच लाँग जम्प, रोलर स्केटींग इ. शिकून घ्या की पटकन सटकता येईल.
असो. लेख आवडला. वाचून मजा वाटली. माझे फुकटचे सल्ले ह. घ्या