हिंदुस्थान हा शब्द काय फार जातीयवादी आहे का ?

नक्की सांगता येत नाही. कोणत्या संदर्भात विचारत आहात त्यावर उत्तर ठरेल. स्वातंत्र्योत्तर काळाच्या संदर्भात असेल, तर हो. व्युत्पत्तीवरून म्हणत असाल तर नाही.

पण देशाची घटना लिहिताना, हिंदुस्थान मधला 'हिंदु' शब्द धर्मनिरपेक्षिततेच्या तत्त्वाच्या आड आला असावा. त्या काळची काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका पाहता हे अशक्य नाही. त्यामुळे जुन्या 'भारत' या शब्दाला त्यांनी अधिकृत केले असावे. मात्र 'इंडिया' ला तो प्रश्न आला नाही. त्यामुळे इंग्रजीत तो स्वीकारला गेला असावा.