काही प्रसिद्ध व्यक्तींचा उल्लेख आपण नेहेमी एकेरी करतो. लता, आशा, किशोर.. इति हॅम्लेट
परंतु या व्यक्तीना हाक मारताना ए लता ,ए आशा अशी न मारता अहो लताजी किंवा लतादिदी असेच म्हणू ना? हा तर एक सुसंस्कृतपणाचा भाग आहे आणि तो आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.
आईला आपण ए आई म्हणतो कारण वडील तिला तशी हाक मारतात. त्‍यावेळी  आई वडिलाना अहो म्हणायची तेव्हा आपोआपच आपणही त्याना अहो म्हणू लागलो.आता आई वडील एकमेकाना ए म्हणतात तेव्हा मुलेही दोघानाही एकारार्थी संबोधू लागली आहेत. बरेच हिन्दी भाषक आपल्या मुलाना नातवंडानाही 'आप ' असे संबोधतात. आणि त्यात कृत्रिमपणा आहे असे वाटत नाही तो त्या भाषेचा गुण असेल. त्यामुळे आपल्या राकटपणाच्या अभिमानाचा झेंडा एकेरी संबोधनाच्या वापरानेच फडकत ठेवायला हवा असे नाही.