असहमत!

कपडे नाही पण असे कपडे केलेल्या स्त्रीची देहबोली बघितली जाते.

(१) कपडे नाही की देहबोलीही नाही... अगदी नखशिखांत कपडे घातलेल्या किंवा शालीन देहबोली असलेल्या स्त्रियाही अत्याचाराच्या तडाख्यातून सुटत नाहीत.
(२) तसेच कितीही उत्तानक देहबोली असली तरीही ओरबाडणे हे पाशवीपणाचेच लक्षण राहते. असल्या चाळ्यांकडे लक्षही न जाणारे अनेकजण आहेत.

दोन तुकडे घातलेल्या स्त्रीची देहबोली सुर्यस्नानची असेल तर नजरा चळतील कशाला?
(१) देहबोली सूर्यस्नानाची असली तरी चळायच्या त्यांच्या नजरा चळतातच.
(२) दोन तुकडे घातलेल्या काहींची देहबोली सूर्यस्नानाच्या बरीच पलिकडचीही असते...

एकूणच बलात्कार करणाऱ्याची अथवा न करणाऱ्याची प्रेरणा त्याच्या/तिच्या स्वत:मध्येच आहे... समोरील ललनेने केलेल्या वेषभूषेवर अथवा अंगविक्षेपांवर नाही.