संस्कार या शब्दाचा अर्थ प्रक्रिया करणे असा आहे ती चांगली किंवा वाईट दोन्ही असू शकते म्हणून सुसंस्कार आणि कुसंस्कार असे शब्द वापरतात.  हल्लीच्या पिढीवर चांगले म्हणजे सुसंस्कार होत नाहीत असा म्हणणाऱ्याला म्हणायचे असावे.आपले संस्कार म्हणजे मराठी घरात बहुतांश आढळणारे असे त्या व्यक्तीला म्हणायचे असेल.कारण कसलेतरी (चांगले किंवा वाईट)संस्कार आजूबाजूच्या परिसरातून मुलांच्या मनावर होतच असतात. आपल्याला प्रयत्नपूर्वक त्याला/तिला योग्य संस्कार घडवून आणावे लागतात.योग्य आणि अयोग्य याचा निर्णय आपणच घ्यायचा असतो.त्यामुळे याबाबतीत इतर काय सांगतात इकडे लक्ष न देता आपल्या मनास काय चांगले वाटेल आणि मुलाच्या ग्रहणशक्तीला कोणते शक्य होतील असे संस्कार घडवण्याचा प्रयत्न करावा.