आमच्याकडेही (माहेरी) ३/४ मांजरी आहेत. सगळ्यांना आवडतात. एक पिवळा-पांढरा गब्दुल बोका आहे. तो कायम सोफ्यावर पहुडलेला असतो. आणी सोफ्यावर जर कोणी बसलेले असेल तर सरळ त्यांच्या मांडीवर बसुन लगेच झोपूनही जातो.  आणखी एक मनी, माझी आई पोळ्या करायला लागल्यावर तिथेच ठाण मांडून बसते आणी  ताजी पोळी मिळाल्याशिवाय तिथून हलत नाही. ही सगळी मांजरे ( राका, मिनू, पिनू आणी बल्लू) आमच्या कुटुंबाचे अविभाज्य सदस्य आहेत. घराच्या प्रत्येक खोलीत एकतरी माऊ असतेच त्यामुळे मांजर न आवडणारे (किंवा मांजरांना घाबरणारे) पाहुणे आले की आमची, त्या पाहुण्यांची आणी आमच्या माऊंची थोडी पंचाईतच होते. माझ्या नवऱ्याला लग्नाआधी मांजरं अजिबात आवडत नव्हती. आता मात्र तो थोडा मांजराळलाय.