एक (अति)श्रीमंत महिला एका फळविक्रेत्याकडून फळं विकत घेत होती. तिच्या हातात एक केसाळ गलेलठ्ठ माऊ होते. ती त्या फळविक्रेत्याशी बोलत असताना माऊ, तिथे ठेवलेल्या सफरचंदावर डावली (पंजा) मारु लागले.
फळविक्रेता- अहो, तुमची मांजर सफरचंदाना हात (?) लावतेय. तिला आवरा.
महिला(मांजरीला) - अरे अरे सोनू, असं नाही करायचं, धुतलेली नसतात ती फळं..