वैद्य तुमचे आभार पण भानू अथैय्यांच्या नंतर नाव घेण्याएवढी माझी लायकी नाही हो अजून. उगाच हवा जाईल माझ्या डोक्यात. असो..

मुळात वेशसंकल्पनाच्या क्षेत्रात प्रामुख्याने स्त्रीया आहेत. केशभूषा करणाऱ्या स्त्रीयाच आहेत. रंगभूषा करणारे सगळे पुरूष आहेत आणि बायकांना रंगभूषेच्या युनियन चे कार्ड मिळत नाही त्यामुळे त्या मेकप आर्टीस्ट म्हणून चित्रपटांसाठी काम करू शकत नाहीत मुंबईतल्या महत्वाच्या स्टुडीओज मधे.  त्या युनियनच्या लोकांमधे एक प्रकारची इनसिक्युरीटी आहे त्यामुळे 'धंदा' करणे यातही शिरेल असं कारण देऊन युनियन चे कार्ड नाकारतात. 

बाकी तांत्रिक बाबतीत बघायला गेलं तर सगळ्यात कमी मुली दिसतात ते छायाचित्रणकार म्हणून आणि साऊन्ड रेकॉर्डीस्ट म्हणून. कॅमेऱ्याच्या बाबतीत म्हणायचे झाले तर कलात्मकतेबरोबरच शारीरीक कष्टाचेही हे काम असते म्हणून अनेकदा स्त्रियांना डिस्करेज केले जाते. हे माझ्याबाबतीत घडले आणि मी सिनेमॅटोग्राफर बनण्याचा विचार सोडून दिला.  सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सिनेमॅटोग्राफर मुली आहेत. एक उदाहरण म्हणजे अपर्णा धर्माधिकारी.  साऊन्ड साठी खरंतर का मुली जात नाहीत हे मला पण माहित नाही. पण एक खरं साऊन्ड काय किंवा कॅमेरा काय या दोन्ही विभागांमधे एक प्रमुख असतो आणि बाकी हाताखालचे असिस्टंटस आणि लेबर अशी विभागणी असते. लेबर क्लास वाल्या लोकांना एका बाईने आपल्याला ऑर्डर्स देणे हे पचतेच असे नाही. त्यांच्याकडून चुकीच्या कॉमेंटस् येऊ शकतात पण ह्यासाठीच थोडे जास्तीचे कष्ट घेतले आणि आपली मॅनिप्युलेटीव्ह स्किल्स वाढवली तर हेच लेबर लोक तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण तोवर खूप मोठ्या स्ट्रगलची तयारी हवी.

माझ्या हाताखाली जेव्हा ड्रेसमन म्हणून ५०-५५ वर्षाचे बाप्ये लोक कामाला येतात तेव्हा सुरूवातीला मलाच कळायचं नाही की यांना कसं नी काय सांगायचं. पण जमलं हळूहळू आणि त्या लोकांना डिझायनर म्हणून रोज नवीन मुलींच्या हाताखाली काम करायची सवय होतीच. असो.. विषय भरकटला...