श्री. सर्वसाक्षी,
लेख सुंदरच आहे.
आत्महत्या आणि आत्मबलिदान ह्यात फरक आहे असे मला वाटते.
आत्महत्या दुर्बल मनाच्या प्रभावाखाली केल्या जातात तर आत्मबलिदानासाठी मनाचा कणखरपणा आवश्यक असतो.
क्रांतिवीरांचे बलिदान, मानवी बॉम्ब, ११/९ घडवून आणणारे ह्यांचा उद्देश एकच असला तरी क्रांतिकारकांनी निरपराधांचा बळी जाणार नाही ह्याची काळजी घेतल्याचे जाणवते. म्हणूनच त्यांना क्रांतिकारक आणि इतरांना अतिरेकी म्हणतात. त्या त्या चळवळीचे समर्थक आणि ज्यांच्या विरोधात ती चळवळ असते त्यांची मते परस्परविरोधी असणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठीही निरपराधांचा बळी घेणे मी निषिद्ध मानतो.
'उदात्तीकरण' हा शब्द जरा चुकीचा वाटतो. जी गोष्ट उदात्त आहे त्याचे उदात्तीकरण कसे करता येईल? जी गोष्ट सर्वसामान्य असते ती जेंव्हा फार महान असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न होतो त्याला उदात्तीकरण म्हणता येईल. राष्ट्रासाठी बलिदान (सैनिकांचेही) हे उदात्तच म्हणावे लागेल. तसेच, निरपराधांचा बळी घेतलेला नसेल तर मानवी बॉम्बचे बलिदानही उदात्त मानावे.
गांधीजींवर बरीच उलट-सुलट चर्चा अनेकदा झाली आहे. दोन्ही बाजूंची मते ठाम आहेत. त्यामुळे वातावरण तापण्यापलीकडे त्यांतून काही निष्पन्न होताना दिसत नाही. असे वाद टाळता आले तर ज्या उद्देशाने मूळ लिखाण केलेले असते तो उद्देश अबाधित राहून वाचकांमधील आदरभावना वृद्धींगत होईल असे वाटते. असो.