मला सापडलेलं एक कारण -
शाळेत आणि घरात दिली जाणारी वागणूक.
इथल्या शाळेत प्रत्येक मूल leader असते. त्याला समान वागणूक मिळते. शिक्षकांच्या मर्जीतल्या किंवा २-४ हुशार मुलांना पुढे पुढे करायचे असा भेदभाव नसतो. वक्तृत्वात प्रत्येक विद्यार्थ्याला भाग घ्यावा लागतो. नाटकात प्रत्येकाला स्टेजवर उभे राहावे लागते.
गेल्या वर्षी माझ्या मुलीच्या दुसऱ्या इयत्तेतील संपूर्ण वर्गाला एक नाटिका रचायचे काम होते. लिहायचे मुलांनी, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, वेशभूषा, मेक-अप, कलाकार सर्वच मुले. त्यांनी आपापल्या आवडीनुसार कामे निवडली आणि सुरेख नाटक बसवले.
घरातही लहान मूल एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे म्हणून स्वीकारले जाते. घरातील निर्णय, खरेदी, बोल-चाल यांत मुलांना सहभागी केले जाते. लहानपणापासून त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कला-खेळात भाग घेण्यास प्रोत्साहित केले जाते.
या सर्वांचा फायदा प्रचंड आत्मविश्वास मिळवण्यात होतो. जो आपल्या भारतीयांमध्ये नाही.
मला तुमचे म्हणणे पटले. माझ्या परीने मी माझे एक कारण दिले. अशी अनेक कारणे असू शकतील. तुम्ही केलेले निरीक्षण मी ही केले आहे आणि मला ते सहज पटते.