संस्कार या शब्दाचा अर्थ चांगले आणि वाईट यात भेद करायला शिकणे असा असला पाहिजे, असे मला वाटते.
रावसाहेबांशी सहमत. बरे-वाईट या सापेक्ष गोष्टी आहेत. मला जे बरे-वाईट वाटते ते इतरांना वाटेलच असे नाही. (आणि उलट)

रामरक्षा किंवा तत्सम श्लोकांच म्हणाल तर माझ्या आई-वडिलांनीही ते मला कधी शिकवले नाहीत. त्यामुळे माझे व्यक्तिगत आयुष्यात काडीचेही  फायदा/ नुकसान झाले नाही.

यावरून मी माझ्या मुलीला रामरक्षा आणि इतर शिकवलं पाहिजे असं माझ्या कधी डोक्यातही येत नाही. पण इतरांचा आदर, सच्चाई, वागणूक याचे धडे दिले आहेत. रामायण-महाभारताची पुस्तके आणून दिली आहेत. जी ती मोठ्या प्रेमाने वाचते. त्यामागील भावना तिला आपला देश, संस्कृती, इतिहास, महाकाव्य यांची ओळख व्हावी इतकाच आहे.

याच्या व्यतिरिक्त तिला जात म्हणजे काय, हिंदू धर्म कसा ग्रेट आहे याबाबत कधीही सांगितलेलं नाही. तिच्या खाण्यावर आमचे निर्बंध नाहीत. काय खायचे आणि काय नाही हे त्यांनी आपापल्या आवडीनुसार ठरवायचे.

स्वच्छता राखणे, इतरांना मदत करणे, आपल्यापासून त्यांना इजा न पोहोचवणे (शारिरीक आणि मानसिक), इतरांचा आदर करणे हे माझ्यामते संस्कार आहेत.