आपली संस्कृती चापलुशीची संस्कृती आहे. आपण न्यूनगंडालाच विनम्रता समजतो आणि आत्मविश्वासाला गर्व. मागे मनोगतवर झालेली सामान्य का क्षुद्र चर्चा बघा. किंवा भारतातले रियालिटि शो बघा (Indian idol वैगेरे)... बराच वेळ स्पर्धक आणि परीक्षक एकमेकांची चापलुशी करण्यातच घालवतात...
आणि जर कोणी न्यूनगंड नाही बाळगला तर लगेच याला "ग" ची बाधा झाली आहे असं म्हणून आपण मोकळे होतो...
अमेरिकेत जर मी इंटरव्ह्यूला गेलो तर मी सरळ असं म्हणू शकतो की बाकी इंटरव्ह्यूला आलेल्या लोकांपेक्षा मी जास्त हुशार आहे कारण अमुक अमुक... किंवा माझ्या क्षेत्रात I am the Best कारण अमुक अमुक... भारतात जर मी अस म्हणालो तर इंटरव्ह्यू घेणारा म्हणेल स्वतःला फार शहाणा समजतो थांब तुला दाखवतोच... आणि मग भारतातल्या सगळ्या राज्यांच्या राजधान्या सांग वगैरे असंबद्ध प्रश्न विचारेल...
थोडक्यात आपल्याकडे विनम्रता/न्यूनगंड यांना कुवती पेक्षा खूपच जास्त महत्त्व आहे आणि इथे बराच जास्त व्यावहारिक दृष्टिकोन असल्याने कुवतीला जास्त महत्त्व आहे.