घरातही लहान मूल एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे म्हणून स्वीकारले जाते. घरातील निर्णय, खरेदी, बोल-चाल यांत मुलांना सहभागी केले जाते. लहानपणापासून त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कला-खेळात भाग घेण्यास प्रोत्साहित केले जाते.

........पूर्णपणे सहमत!! ठळकपणे जाणवणारा फरक म्हणजे इथल्या पालकांची आपल्या मुलांवर सन्स्कार करायची पद्धत. फाजील लाड अजिबात नाहीत व मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते स्वातंत्र्य. प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे असमान/वैशिष्ट्यपूर्ण असते हे इथे सर्वमान्य आहे, आणी ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन इथला समाज इतकी प्रगती करू शकला असावा असे मला वाटते.   ह्याउलट आपल्याकडे मुलांना जास्तीत जास्त जपण्याची पद्धत आहे जेणेकरून मुले कुटुम्बकेन्द्रीत बनतात व त्यांच्यात महत्त्वाकांक्षेचा अभाव असतो. भरीत भर म्हणून आपल्या समाजातील 'मी मोठा-तू लहान', 'दुसऱ्यांचे पाय खेचणे'  ह्या प्रबळ प्रवृत्ती व व्यावसायिकतेचा पूर्णं अभाव ह्या त्रुटींमुळे प्रगतीला मोठी खीळ बसली आहे.