मला वाटत होते की मनोगत हे नि:पक्षपणे मत व्यक्त करण्याचे साधन आहे.

मग जातीयवाचक लिहिणाऱ्यांवर सक्त कारवाई करून पक्षपातीपणा का करावा बरे?

याच जातीयवादाने आपल्या देशाची, समाजाची, स्वतःची आणि काही प्रमाणात आपल्या भावी पिढीचेही नुकसान केले आहे.

असं तुमचं मत आहे...(माझंही आहे) पण माझंच बरोबर आणि मला इतर मतं क्षुद्र वाटतात (कीव येते) म्हणून मी ती व्यक्तच करू देणार नाही हा जातीवादच नाही का?

'प्रतिबंध हाच उत्तम उपाय आहे!'

आई वडिलांनी नको करू सांगितलं म्हणून किती गोष्टी केल्या नाहीत तुम्ही?

सेन्सॉरशिप कधीच यशस्वी होऊ शकलेली नाही आणि होणारही नाही. Expression ला प्रतिबंध करून विचार किंवा भावना नष्ट होत नाहीत, फक्त घुसमट आणि असंतोष वाढतो.