वा, प्रित,
आल्याआल्या मेजवानीच दिलीत हो!
पण सगळ्याच कायनेटीक काकू अशा नसतात हो. काही नियम पाळणार्याही असतात.
पण झकास लिहीला आहे लेख. मला आठवले, मी मैत्रिणीच्या घराचा रस्ता शोधत असताना अचानक एका गल्लीत तिच्या इमारतीचे नाव दिसले आणि सरळ जाण्याचा निर्णय निमिषार्धात बदलून मी वळले. (हात न दाखवता, दिवे न मिचकवता..) आणि मागून येणारा एक बाईकस्वार कष्टाने तोल सावरत सरळ गेला आणि संतापाने 'नॉन्सेन्स' ओरडला. (मला खात्री आहे, मी महिलावर्गाची प्रतिनिधी नसते तर एखादी xxx शिवी पण मिळाली असती!) पण त्याच्या 'नॉन्सेन्स' मागची तळमळ आता जाणवतेय.. यापुढे काळजी घेईन म्हणते.
आपली(स्कूटीस्वार)अनु