जीवन जीज्ञासा,प्रियाली,शशांक, क्लिंटन,गावरान गंगी आणी पेठकर ..‌सर्वांचे मनापासुन धन्यवाद. माझा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न असुन तुम्ही वेळ काढुन वाचलात.आता नवे लिहायला हुरुप येइल.

प्रियाली,रोलर स्केटींग तर इथे परवड्णार नाही पण लांब उडीचा सराव सुरु केला आहे.तुमचे एकून.. हात पाय धड राहीले तर त्याचे पुढे काय झाले ते नक्की कळवीन.

शशांक, गारफील्ड चे चित्र आणुन लवकरच लावेन.पण तुमच्या सांगितलेल्या उपाया मुळे नवरा मात्र जाम खुश झाला आहे सध्या!

प्रभाकर,तुमचा उपाय एक्दम मस्त आणी स्वस्त आहे. लगेच अमलात आणला.आता फक्त माझ्या मुळे त्या मांजरांना इजा न होता ती दवाख़ान्यात जाउ नये म्हणजे झाले.