रामायणातली ही गोष्ट आहे. खूपच वर्षापूर्वी वाचली असल्याने काही तपशीलात कमतरता असण्याची शक्यता आहे.
राम-रावण युद्धाच्यावेळी रावणाचे दोन पराक्रमी सेनानी अहिरावण-महिरावण हे राम-लक्ष्मणांना पुरून उरले. मुख्य म्हणजे अहिरावण-महिरावण (किंवा त्यापैकी एकतरी) मेला की त्याच्या रक्तातून नवे अहिरावण तयार व्हायचे. त्यामुळे रामाला मोठा प्रश्न पडला होता. त्यावेळेला नारदमुनी आले आणि त्यांनी सांगितले की अही(किंवा महि)रावणाच्या पत्नीकडून याचे रहस्य आणि उपाय कळेल. त्यापत्नीची रामाला मदत करायची तयारी होती, पण त्यासाठी तिची अट होती की रामाने एक रात्र तिच्यासोबत घालायला तयार झाले पाहिजे. दुसरा कोणताच उपाय नसल्याने रामाला कबूल करण्यावाचून गत्यंतर नव्हते. पण त्यांनी एक युक्ति ठरवली. त्यांनी सांगितले की मी येईन पण जर काही अपशकून होता कामा नये.
ठरल्याप्रमाणे राम त्या शयनागारात येण्यापूर्वी त्यांनी भुंग्यांना(वाळवीला) तो मंचक पोखरून ठेवण्यास सांगितले. त्यामुळे राम त्यावर बसताच तो मोडून कोसळला. हा अपशकून आहे असे सांगून राम तेथून निघून गेला. अशा रितीने त्याचे एकपत्निव्रत अभंग राहिले पण अहिरावण(किंवा महिरावण) याच्या नाशाचा उपाय त्यांना मिळाला.
रक्ताचा थेंब जमिनीवर पडला तरच त्यातून नवीन अहिरावण तयार होतील असा त्याला वर होता. त्यामुळे मग रामाने पुन्हा भुंग्यांना सांगून ते रक्त जमिनीवर पोहोचायच्या आत पिऊन टाकायची व्यवस्था केली. ही माहिती त्या राक्षसपत्नीने रामाला दिली. त्यामुळे त्या राक्षसांचा वध होऊ शकला.
रामामागे इतर बायका लागल्या होत्या याचे हे एक उदाहरण आहे.
कलोअ,
सुभाष
ता.क. महाजालावर काही संकेत स्थळे अस्तात ती बंद केली तरी नवीनच तत्सम स्थळे उघडतात त्याला आम्ही अहिरावण-महिरावण म्हणतो. अर्थात त्यावर स्पायवेवर नष्ट करणारे उपाय आहेत हे बरे.