आमच्याकडे साधारण अशीच करतात. साधारण म्हणण्याचे कारण असे की चिंच-गूळ न वापरता आमसुले वापरतात. तसेच, दाण्याचा कूट गंधा इतका मुलायम न वाटता भरडसरच ठेवतात.

भगरीमध्ये दोन प्रकार आहेत साधी भगर आणि मसाला भगर. साध्या भगरी बरोबर वरील आमटी करण्याची पद्धत आहे. मसाला भगरीत वरील (आमटीतले) जिन्नस असतातच त्यामुळे आमटीची गरज नसते. मसाला भगर साजूक तुपा बरोबर लई झकास लागते बुवा.