दही घुसळून घेण्यापेक्षा, ते २ तास टांगून ठेवावे आणि तो चक्का, थोडा खवा, दूध, साखर, सहा तास दुधात भिजवलेली अस्स्सल केशराची पूड वापरून पीयुष करू पाहा. अपेक्षित ओशटपणा येईलच आणि चवीतही खूप फरक पडेल. ही, मुंबईच्या पणशीकरांच्या पीयुषच्या जवळ जाणारी चव आहे.